बसव प्रतिष्ठाणच्या मागण्यांवर शासनाचे मंजुरीचे शिक्का मोर्तब… राज्यातील होमगार्डना न्याय मिळवण्यासाठी चालू असलेले संघर्षाला अखेर यश…. मुरूम ता.०९, राज्यातील होमगार्ड समस्या/मागण्या घेऊन बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत, दि.०८ जून २०२१ रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसी बैठक संपन्न झाली आणि प्रलंबित ११ मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन ते तात्काळ
शेतकऱ्यांना महाबीजचे सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्यावे.. मनसेचे कृषीमंत्र्या कडे निवेदन उमरगा-लोहारा ता.०७ खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात महाबीजचे सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. विक्रेत्यांकडून सोयाबिन बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी शेतक-यांना खाजगी कंपनीचे महागडे बियाणे खरेदी करावे लागत आहे. शेतकऱ्यांना महाबीज कंपनीचे सोयाबिन बियाणे उपलब्ध करून दयावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कृषी मंत्र्याकडे करण्यात
पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढी विरोधात उमरगा काँग्रेस कमिटीचे वतीने आंदोलन.. उमरगा ता.०७, पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढी विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा येथे आंदोलनकरण्यात आले मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या करामधून लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. युपीए सरकारच्या काळामध्ये पेट्रोलवर एक्साईज ड्युटी 9.48 रुपये होती ती
कलाकार, कंत्राटी कामगारानंतर गरीब गरजूंना अरविंदो मीरा संस्थे मार्फत धान्य वाटप नवी मुंबई, दि. ७ – सुप्रसिद्ध अभिनेत्री नयन पवार यांनी पुढाकार घेऊन अरविंदो मीरा संस्थेच्यावतीने विष्णूदास भावे सभागृह वाशी येथे सर्व स्तरातील गरजूंना धान्य वाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पहिले लॉकडाऊन करण्यात आले. शासनाने कडक निर्बंध लावले.रोजगार बंद पडले. लोकांची उपासमार होऊ लागली. उत्पन्नाचे सगळे मार्ग बंद झाले.
किसान ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळानिमित्त सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर, महिलांनीही केले रक्तदान.. मुरूम ता.०६, येथील किसान चौकातील किसान ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने मुरुम शहरातील किसान चौक येथे शिवस्वराज्य दिन भगवा ध्वजरोहन करुन, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आले, मुरुम पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगताप साहेब ,डॉ. सत्यजित डुकरे सर व माजी सैनिक व्यंकटराव
श्री छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा.. मुरूम ता.०६, येथील यशवंत नगर भागातील श्री छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा केला, सर्व धर्म समभाव, न्याय, धर्म, जनकल्याण, सुशासन आणि राष्ट्रीयता चे प्रतीक – राजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त श्री छत्रपती शिवाजी गणेश मंडळांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी वृक्षारोपण ही करण्यात
शहरात मराठा सेवा संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दीन साजरा.. मुरूम ता.०६, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा सेवा संघ आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक अभिवादन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील योगेश जगताप, प्रा. दत्ता इंगळे, भीमराव फुगटे, प्रा. डॉ. दत्तात्रय मुरुमकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक प्रतिमेस पुष्पहार घालून महापुरुषांच्या घोषणा देत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आस्मानी सुलतानी
समशान भूमी स्वछता समितीच्या वतीने कोव्हिड सेंटर येथील रुग्णांना दूध व अंडी वाटप…. मुरूम ता.०४, येथील विट्ठलसाई सहकारी साखर कारखाना जवळील कोविड केअर सेंटर वर उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांना मुरूम येथील समशान भूमी स्वच्छता समितीच्या वतीने दूध व अंडी या पॊष्टीक आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने कोव्हिड सेंटर वर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शाल,पुष्पहार घालून सत्कार करण्यात
पर्यावरण दिनानिमित्त माधवराव पाटील महाविद्यालयात वृक्ष लागवड मुरूम, ता.५ (बातमीदार) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता.५) रोजी महाविद्यालय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ.रवि आळंगे, डॉ.संध्या डांगे, महाराष्ट्र पत्रकार