श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदिपन सभारंभ संपन्न मुरुम ता. 11 श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना लि., मुरुम या कारखान्याचे कामकाज कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नियोजनबध्द मार्गदर्शनाखाली सुरु असून कारखान्याचा हंगाम 2020-21 साठीचा बॉयलर अग्नी प्रदिपन सभारंभ बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर आजरोजी संपन्न झाला. कारखान्याच्या हंगामासाठी करावयाची मशीनरीची कामे पुर्ण करण्यात
शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जावुन नागरीकांची तपासणी मुरुम ः शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जावुन नागरीकांची तपासणी करण्यात येत आहे.मुरुम ः शहरात गेल्या सहा महिन्यात बुधवारपर्यंत १८५ जणांना कोरोनाची लागण झाली होती.यातील ३७ जेष्ठांसह १७७ रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात करुन यशस्वीपणे घरी परतले आहेत.मुरुम शहरात आठ प्रभाग असून या प्रभागातील २५ गल्ल्यांमध्ये बुधवारपर्यंत
आलूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या १७ पैकी ९ गावात ९० कोरोनाचे रुग्ण आढळले.. मुरुमः उमरगा तालुक्यातील आलूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या १७ पैकी नऊ गावात आतापर्यंत कोरोनाचे ९० रुग्ण आढळले असून त्यापैकी ६० जणांनी मंगळवारपर्यंत कोरोनावर यशस्वीपणे मात करुन घरी परतले आहेत.तर सात जणांचा या आजाराने आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.यामध्ये आलूर येथे सर्वाधिक तीन तर मुरळी,कदेर,केसरजवळगा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा
मराठा समाज शांत बसणार नाही : छत्रपती संभाजीराजे तुळजापूर : महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ५८ शांत मोर्चे निघाले. राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अनेकदा निवेदन आंदोलने मोर्चे काढून सातत्याने याविषयी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मराठा समाज हा आज आर्थिक सक्षम नसल्यामुळे आणि शैक्षणिक आरक्षण मिळावे, यासाठी रस्त्यावर उतरून सरकारकडे न्याय मागतो आहे. परंतु, मागच्या सरकारने कायद्याच्या चौकटीत बसून दिलेले १३ टक्के आरक्षण
जिल्हयात नाफेड खरेदी केंद्र सुरु उस्मनाबाद,दि.5(जिमाका):-हंगाम 2020-21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदी करीता केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हयात नाफेड खरेदी केंद्र सुरु करण्यात येत असून खरेदीसाठी नोंदणी दि. 01 ऑक्टोंबर 2020 पासुन सुरु झाली आहे. खरेदी ही ऑन-लाईन नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची होणार असुन प्रत्यक्ष खरेदी दि. 15ऑक्टोंबर 2020 पासुन सुरु होणार आहे. ज्या
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर -पालकमंत्री शंकरराव गडाख या मोहिमेसाठी 1097 आरोग्य पथके व 3194 कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्ह्यातील 3 लाख 43 हजार कुटुंबांपैकी 2 लाख 62 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण उस्मानाबाद, दि.4(जिमाका):- जिल्ह्यात `माझे कुटुंब माझी जबाबदारी` या मोहिमेत आतापर्यंत 2 लाख 62 हजार 820 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून या मोहीमेस नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेतकरी-कामगार विरोधी कायद्याचा निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन उस्मानाबाद, ता.०२, केंद्रातील भाजप सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयके व कामगार विरोधी विधेयके हुकूमशाही पद्धतीने मंजूर करून घेतल्यामुळे जनसामान्यांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे हे अन्यायकारक कायदे मागे घेण्यात यावीत, या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर शुक्रवार, दि.2 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.तसेच शेतकरी यांच्या सह्याचा शुभारंभ ही करण्यात आला उस्मानाबाद
हाथरस प्रकरण व काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्कीच्या निषेधार्थ मुरूम शहरात काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा लोकप्रतिनिधीना धक्काबुक्की, लोकशाहीची हत्या-शरण पाटील मुरूम,ता.२ (प्रतिनिधी) : येथील शहर काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांना धक्काबुक्कीच्या निषेधार्थ शहरातील शिवाजी चौक येथे शुक्रवारी (ता.२) रोजी सायंकाळच्या सुमारास योगी यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आले, महात्मा बसवेश्वर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत
२ ऑक्टो राष्ट्रपिता महात्मा गांधीं जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!! खरच गांधीजी तुम्ही आज असते तर…. पत्रकार रामलिंग पुराणे गांधीजी तुम्ही आज असते तर.. तुमच्या डोळ्यांनी हे स्वतंत्र भारत कसे सुजलाम सुफलाम झाले आहे पाहिले असते, तुम्ही पाहिले असते, तुम्ही नसते तर आज ही आम्ही ब्रिटिश राजवटीत गुलाम बनून राहिलो असतो *अहिंसा* नावाचा हत्यार उगारून तुम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिला आणि