विजयकुमार मठपती यांचे दुःखद निधन मुरूम, (प्रतिनिधी) : येथील नूतन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयकुमार शिवशंकर मठपती यांचे गुरुवारी (ता. १७) रोजी सकाळी अकरा वाजता अल्पशा आजाराने लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. ते मनमिळावू, मितभाषी स्वभावाचे असल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार होता. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख या परिसरात निर्माण
मराठवाडा मुक्ति संग्राम दिन, स्मरण एका लढवैय्या योद्ध्याचे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या या पवित्र दिवशी ज्या महान देश भक्तांनी मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत अमुल्य असे योगदान दिले आपल्या जिवाची पर्वा न करता अनेक यातना सोसुन हा मराठवाडा जुल्मी सत्तेपासुन सोडवला. अफाट देशप्रेम अचाट ईच्छाशक्ती च्या जोरावर संघर्ष करुन या भागातील तमाम जनतेला या जोखडातुन मुक्त केले आणि एका नव्या पर्वाची सुरवात केली.या साठी ज्या
कंटेकूर शाळेत उन्हाळ सुट्टीतील धान्य व धान्यादी माल वाटप मुरुम, (प्रतिनिधी) : कंटेकूर,ता.उमरगा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी तील विद्यार्थ्यांना उन्हाळ सुट्टीतील ३४ दिवसाचे शासनाकडून काल प्राप्त झालेल्या धान्य व धान्यादी माल कोविड-१९च्या नियमांचे पालन करुन मुख्याध्यापक कमलाकर मोटे, पोलीस पाटील लक्ष्मण पांचाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कल्लेश्वर पांचाळ, उपाध्यक्ष रुपाली बालाजी
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा होणार, पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण उस्मानाबाद,दि.15(जिमाका):- उस्मानाबाद शहर व जिल्हयामध्ये कोविडचे रुग्ण संख्या वेगाने वाढत असल्याने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने दिनांक 17 सप्टेंबर रोजीचा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ध्वजारोहण कार्यक्रमाशी निगडीत कर्मचारी अधिकारी व पोलीस अधिकारी यांना प्रवेश
रामलिंग पुराणे यांना राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार जाहीर मुरूम, ता.१३ (प्रतिनिधी) : बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे बसव प्रतिष्ठानचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांना नुकताच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबईचा राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासम्मेलन २०२० मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे या संस्थेचे अध्यक्ष अॅ ड. कृष्णाजी जगदाळे यांनी एका
पत्रकार निंबरगे यांची भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड मुरूम, ता. १२ (बातमीदार) : येथील पत्रकार महेश निंबरगे यांची भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या उमरगा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील व प्रदेश उपाध्यक्ष शांताराम खुडे यांनी निंबरगे यांची नियुक्ती केली आहे. निंबरगे हे गेल्या १५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. वृत्तपत्राच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील प्रश्नांना
ऊस उत्पादक शेतकरी बांधवासह खरीप पिके सोयाबीन,उडीद मूग पिकाचे नुकसान भरपाई शासनाने दयावी – शरण पाटील.. उस्मानाबाद- मागिल आठवड्यात वादळी वा-यासह पावसामुळे,जिल्हातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचे आतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी. तसेच खरीप पिके सोयाबीन,मूग,उडीद पिकांचे खूप नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी याबाबत आज झालेल्या उस्मानाबाद जिल्हा परिषदे च्या सर्वसाधारण सभेत ठराव पाठविण्याची मागणी जिल्हा
उमेदवारांनी आपला आधार क्रमांक तात्काळ अपडेट न केल्यास नोंदणी रद्द उस्मानाबाद,दि.10(जिमाका):-महाराष्ट्र शासन,कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारासाठी एम्पलॉयमेंट नोंदणी कार्ड www.mahaswayam.in हे वेबपोर्टल विकसीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छुक उमेदवार ,कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे उमेदवार तसेच या वेबपोर्टलवर नोंदणी केलेले सर्व उमेदवार ज्यांनी अद्याप पर्यंत आपले आधार कार्ड एम्पलॉमेंट कार्डशी लिंक केलेले नाही.
कारखान्यात उत्पादित ऑक्सीजन सिलेंडर्स पैकी 80 टक्के सिलेंडर्स पुरवठा करण्याकरीता राखीव उस्मानाबाद,दि.10(जिमाका):-महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020” प्रसिद्ध केले असून करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,उस्मानाबाद यांनी प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यामधील कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी