ग्रामदैवत श्री कपिलेश्वर यात्रा रद्द कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समितीचा निर्णय मुरूम, ता. १२ (बातमीदार) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९७२ पासून चालत आलेली परंपरागत मुरूम ग्रामदैवत श्री कपिलेश्वर यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे सर्वानुमते ठराव घेऊन सोमवारी (ता.१०) रोजी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. १९७२ पासून या मंदिराला एक वैभवशाली परंपरा आहे. दरवर्षी श्री कपिलेश्वर यात्रा अत्यंत भव्य-दिव्य सोहळ्यात संपन्न केली जाते. सर्व
मुरूम ता. ९, उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष शरण बसवराज पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून देशातील बेरोजगारी बाबत ऑनलाईन आंदोलन छेडले. दि.९ रोजी शरण बसवराज पाटील या फेसबुक पेज वरून “केंद्र सरकारकडून युवकांना रोजगाराची मागणी” या विषयावर त्यांनी आज युवकाशी संवाद साधला व ऑनलाईन आंदोलन छेडले. गेल्या 5-6 वर्षा पासून भारतात बेरोजगारीची संख्या वाढत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हणाले व तसेच भाजपच्या
महसुलमंत्री यांनी घेतली घेतली उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना उपाययोजना संदर्भात बैठक, प्रदेश कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यायाठी विविध सुचना मांडल्या महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनां संदर्भात तुळजापूर येथे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महिला व बालविकासमंत्री ना.यशोमती ठाकूर,प्रदेश कार्याध्यक्ष मा. बसवराज पाटील,माजी मंत्री मा. मधुकरराव चव्हाण जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे,मुख्य कार्यकारी अधीकारी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे बुधवारी पहाटे निधन झाले आज निलंगा येथे त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील यांनी भेट दिली डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले यावेळी माजी मंत्री मधुकराव चव्हाण,उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे,जि.प.माजी सदस्य दिलीप भालेराव अँड बादाडे
ग्रामपंचायत कार्यालय केसरजवळगाच्या वतीने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुरुम, ता.६ (प्रतिनिधी) : केसरजवळगा, ता.उमरगा येथील ग्रामपंचायत कार्यालय व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम गुरुवारी (ता.६) रोजी आयोजित करण्यात आला. गांधी विद्या मंदिर प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेत प्रशालातून ऐश्वर्या युवराजसिंग राजपूत ९३.२५ टक्के गुण मिळवून प्रथम, अंकिता लक्ष्मीपुत्र सनगुंदे ९१ टक्के गुण घेऊन द्वितीय तर अनिषा
मुरूम, ता. ५ (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात भूगोल विभागाच्यावतीने आयोजित एन्व्हायरमेंटल असेसमेंट ऑफ कोविड-१९ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे बुधवारी (ता.५) रोजी आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचे मार्गदर्शक गोवा राज्यातील मल्लिकार्जुन चेतन मंजू महाविद्यालय, कॅनाकॉनाचे प्रा. डॉ.एफ.एम.नदाफ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबादच्या भूगोल अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ.दादासाहेब गजहंस यांनी केले. वेबिनारच्या अध्यक्षस्थानी नगर शिक्षण विकास मंडळाचे
मुरुम, ता. ४ (प्रतिनिधी) : भारतीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवा परीक्षेत उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड हे राष्ट्रीय पातळीवर ७५२ व्या क्रमांकांने उत्तीर्ण झाले आहेत. या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. ते आयआयटी, मुंबई येथून केमिकल इंजिनीरिंगची बी. टेक.आणि एम.टेक.पदवी मिळविली आहे. गॅलॅक्सि सरफेक्टन्स लिमिटेडमध्ये त्यांनी इंटर्नशिप केली. त्यानंतर
मुरुम, ता.२९ (बातमीदार) : येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातून प्रतिक पाटील याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याला ९९.६० टक्के गुण मिळाले. द्वितीय क्रमांक सोहम अंबर ९८.४० टक्के तर तृतीय क्रमांक कुमारी शितल नाटेकर हीला ९८ टक्के मिळाले. प्रशालेतून विशेष प्राविण्य ९८, प्रथम श्रेणी ८४, द्वितीय श्रेणी ५४ तर उत्तीर्ण ६ असे
मुरूम: येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कुलने माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. या प्रशालेतून बिराजदार तेजस प्रथम क्रमांक ९५.६० टक्के, राठोड विश्वदीप द्वितीय क्रमांक ९४.२० टक्के, भंडारकवठे सौरभ तृतीय क्रमांक ९२.४० टक्के, श्रद्धा मुंडासे चौथ्या क्रमांक ९२.२० टक्के, बिराजदार शिवाजी पाचवा क्रमांक ९१.६० टक्के मिळविल्याबद्ल त्यांच्या प्रशालेचे मुख्याध्यापक अनुराधा जोशी, प्रा.डॉ.पुरुषोत्तम बारवकर, धनराज हाळ्ळे, व्ही.डी.पाटील, सहशिक्षीका देशमुख,
मुरूम : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित एक दिवशीय भाषण संभाषण कार्यशाळा गुरुवारी (ता.३०) रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रा.डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मीर अशा विविध राज्यातून १०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून चर्चात्मकरित्या प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणामध्ये विविध क्षेत्रातील मंडळींचा सहभाग राहीला. यावेळी शिक्षक, प्राध्यापक,